शरद पवार आणि श्रीनिवास पाटलांनी सांगितल्या कॉलेज जीवनातील  एक से बढकर एक खुमासदार आठवणी !

शरद पवार आणि श्रीनिवास पाटलांनी सांगितल्या कॉलेज जीवनातील  एक से बढकर एक खुमासदार आठवणी !

पुणे – पुणे शहरातील जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंचा समावेश असलेल्या ‘स्मरण रम्य पुणे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालं. त्यानंतर आठवणीतले पुणे या विषयावर शरद पवार आणि श्रीनिवास।पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली.दोन्ही नेत्यांनी कॉलेज जीवनातल्या अऩेक आठवणी यावेळी सांगितल्या.

कॉलेजच्या काळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुंदर मुली असल्यामुळे तिकडे ओढा अधिक असायचा. आम्हीही तिकडे गेलो. पण नंतर लक्षात आलं तिथे इंग्लिश बोलणाऱ्या मुलीच जास्त असायच्या. ते काही आम्हाला जमायचं नाही. त्यामुळे मग आम्ही त्यानंतर एसपी कॉलेजकडे मोर्चा वळवला अशी खुमासदार आठवण शरद पवार यांनी सांगितली.

श्रीनिवास पाटील यांच्याविषयीचीही एक खुमासदार आठवण शरद पवार यांनी सांगितली. एका तरुणीमुळे श्रीनिवास पाटील नृत्य शिकले. आणि ते त्याच तरुणीसोबतच एका नृत्य स्पर्धेत सहभागी झाले, तिथं दोघांना सुवर्णपदक मिळालं. म्हणून त्यांवेळी त्यांना नाचा पाटील म्हणायचे असंही पवार म्हणाले.

प्र. के.  अत्रे पुण्यात निवडणुकीत पडले. मात्र मुंबईत निवडूण आले. त्यावर त्यांनी शनिवार वाड्यावर भाषण करताना “माय मरो आणि मावशी जगो” असं ते म्हणाले होते. ते तसं का म्हणाले ते का म्हणतात हे मला कळले असं सांगत कोटी केली.  सिनेमांपेक्षा मला नाटंक अधिक आवडायची. शांताराम बापूंचे काही सिनेमे पाहीले. इग्रंजी चित्रपट पहायला कॅम्पमध्ये जायचो अशी आठवणही पवारांनी सांगितली.

मद्रास कॅफे आणि वेलकम अशी फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली आणि रुपाली प्रसिद्ध हॉटेलची नावे होती. आम्ही त्याला खालचे मद्रास आणि वरचे मद्रास म्हणायचो अशी आठवण  श्रीनिवास पाटील यांनी सांगितली.  आताचे वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी आमचे मित्र होते. वैशाली ते कामाला होते. तेंव्हाच्या वैशालीच्या मालकांना एकच मुलगी होती. आम्ही जगन्नाथला सांगितले, तु मालकाच्या मुलीशी लग्न कर दोन्ही हॉटेल तुझी होतील. पुढं तसंच झालं. ही आठवणही पवार यांनी सांगितली.

शरद पवार फास्ट ड्रायव्हर आहेत. त्यांच्या या वेगामुळेच ते एव्हढं मोठं कार्य करु शकले या शब्दात श्रीनिवास पाटील यांनी पवारांचं कौतुक केलं.   मानदेशाने अनेक मोठी कतृत्वान माणसे महाराष्ट्राला दिली. त्यांचे प्रतिनिधी म्हणून गदीमांच्या नावाने बारामतीत नाट्यगृह उभारले. हे सागंत असतानाच पुणेकरांनी गदीमांचा सन्मान केला नाही. असं शरद पवार यांनी म्हटलंय.

COMMENTS