राज्यात लवकरच राजकीय भूकंप, शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर गुप्त बैठक!

राज्यात लवकरच राजकीय भूकंप, शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर गुप्त बैठक!

मुंबई – कोरोनामुळे राज्यासह देशातील वातावरण बिघडलं आहे. अशातच गेली काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामेंडींमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात मातोश्रीवर गुप्त बैठक पार पडली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील सतत वाढती कोरोनाग्रस्तं रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आपतकालीन परिस्थिती कायद्यांतर्गत इंडियन काउन्सील ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या हाती सर्व सूत्रं देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांचे नेतेही दिल्लीच्या संपर्कात आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच निवासस्थानावर दोन्ही पक्षातील नेत्यांची वारी सुरु आहे. गेली 3 ते 4 दिवस लागोपाठ मोठे नेते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची सातत्याने भेट घेत आहेत. या भेटींमागे मोठं राजकारण होत असल्याचीही माहिती आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS