सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांची आज कराडमध्ये भेट झाली आहे. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार कराडमध्ये गेले होते. या कार्यक्रमापूर्वी शरद पवार आणि उदयनराजे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर उदयनाराजे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
‘महाराष्ट्र क्रांती पक्ष तुमचा फोटो वापरतो, मग आता लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?’ असा प्रश्न त्यांना विचारला असता माझा ‘फोटो वापरत आहेत तर चांगलंच आहे की मग. माझा घसा बसलाय मी काय बोलू. माझ्या हातात घड्याळ आहे आणि शरद पार यांना कमळाचा बुके दिला असल्याल्याचं सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे.
दरम्यान उदयनराजेंच्या या वक्तव्यावरुन उमेदवारीबद्दल अद्यापही निश्चितता झाली नसल्याचे दिसत असून आपण वेळ पडली तर आपण भाजपसोबतही जाऊ शकतो असाच अंदाज आता राजकीय वर्तुळात मांडला जात आहे.
COMMENTS