आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले !

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले !

हैदराबाद –  आंध्र प्रदेशमधील एका दुर्घटनेत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू थोडक्यात बचावले आहेत. मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ३० जण जखमी झाले आहेत. कडपा जिल्ह्यात रामनवमीनिमित्त काढलेल्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान मंडप कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. अचानक सुरु झालेला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला असल्याची माहिती आहे.

दरम्यान कडपा जिल्ह्यातील वोंटिमिटा येथील कोडनड्रमा स्वामी मंदिरात रामनवमीनिमित्त कार्यक्रम सुरू होता. या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांसोबत येथे हजेरी लावली होती. दरम्यान, मंडप पडल्याने लोकांमध्ये मोठी गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली होती. यातून चंद्राबाबू नायडू देखील थोडक्यात बचावले असून दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याबाबतची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

 

COMMENTS