मुंबई – राज्य सरकारने अनलॉक पाचचे आदेश जाहीर केले आहेत.
राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार असून ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे.त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून बंद असलेल्या रेस्टॉरंट आणि बार चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच शाळा, महाविद्यालये ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. तर सिनेमागृह, स्वीमिंग पूल, मेट्रो, धार्मिक स्थळे कधी चालू होणार यबाबतची तारीख जाहीर करण्यात आली नसून सध्या तरी ते बंदच राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे सरकीरनं दुर्लक्ष केलं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS