देशात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच कीटकनाशकाच्या धोरणासंदर्भात केंद्र सरकारने 6 महिन्यांच्या आत उत्तर द्यावे असे आदेश दिले आहे.
वकील प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारने किटकनाशक कंपन्यांच्या निर्मितीवर आणि परवानग्यांवर सरकारचं नेमकं कोणतं नियंत्रण आहे, किंवा नाही, आणि नियंत्रण आणण्यासाठी काय केलं जाणार आहे. याविषयी माहिती याचिकेद्वारे मागितली आहे. या याचिकेवर सज्ञान घेत सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तसेच भूषण यांनी टप्याटप्याने कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
जगात 93 कंपन्यांच्या कीटकनाशकांवर बंदी असतांना भारतात मात्र त्याच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. भारतात अनेक प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी असतांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या कीटकनाशकांमुळे आपल्या अन्नात विष पसरत असून त्याचा परिणाम शेती उत्पनावरही होतांना दिसत आहे.
COMMENTS