संभाजी भिडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल !

संभाजी भिडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल !

मुंबई –  शिवप्रतिष्ठानचे संचालक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, तो एक पाऊल पुढे होता असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याविरोधात ऍड. नितीन सातपुते आणि सामाजिक कार्यकर्ते व भीमा कोरेगाव घटनेचे पीडित संजय रमेश भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. भारतीय घटनेतील अनुच्छेद 19 असलेले प्रतिबंध उपकलम 1, 2, 3, 4 व 5 खाली संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान संभाजी भिडे यांच्यावर पीसीपीडीएनटी 1994 या कायद्याअंतर्गत कलम 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे असे म्हणून संतांचा अपमान करून बहुजनांचे मन दुखावल्यानंतरही सरकारनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे सरकारविरोधात अनुच्छेद 19 प्रतिबंध करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संभाजी भिडे आणि राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS