पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात, केंद्र सरकारनं घेतला निर्णय !

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात, केंद्र सरकारनं घेतला निर्णय !

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. सरकारने 1.5 रुपये एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला असून तेल कंपन्या ही पेट्रोल आणि डिझेलवरील 1 रुपये कमी करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एका लीटरमागे 2.50 रुपयांचा फायदा होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर नजर ठेवण्यासाठी एक कमिटी बनवण्यात आली असल्याचं जेटलींनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्र सरकार राज्यांना देखील 2.5 रुपयापर्यंत वॅट कमी करण्याची विनंती करणार आहे. तसेच केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच रुपयांनी कमी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

COMMENTS