नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुखांनी नियुक्ती केली चौकशी समिती !

नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुखांनी नियुक्ती केली चौकशी समिती !

मुंबई – भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला जात आहे. या फोन टॅपिंगची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीत अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार या दोन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा होत आहे. तसेच शिवसेना नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा  शिवसेना नेत्यांनी दावा केला आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या फोन टॅपिंगची चौकशी आता ही समिती करणार आहे.

 

COMMENTS