पहा प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तूंवर नाही….

पहा प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तूंवर नाही….

प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असल्याने केंद्र सरकारने प्लास्टिक बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणार असून जो कोणी प्लास्टिक वापरताना दिसेल त्याला ५ हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. आज त्याची अंमलबजावणी हि झाली असून अनेक ठिकाणी प्लास्टिक वापरल्याच्या कारणाने दंड भरल्याच्या पावत्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. परंतु प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तूवर नाही याबद्दल अनेकजन अजाणते आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या वस्तूवर बंदी आहे आणि कोणत्या नाही.

***यावर बंदी***
* प्लास्टिकच्या पिशव्या * प्लास्टिकचे चमचे, कप, ग्लास, स्ट्रो *थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, * उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकचे आवरणे * द्रव पदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक *अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक * प्लास्टिक व थर्माकोलचे डेकोरेशन….

***यावर बंदी नाही ***
* पाण्याच्या बाटल्या * कृषी क्षेत्रातील समान साठवण्याचे प्लास्टिक* नर्सरीमध्ये वापरत असलेले प्लास्टिक * अन्नधान्यासाठी ५० मायक्रोनवरील पिशव्या *५० मायक्रोनवरील दुधाच्या पिशव्या * रेनकोट * कच्चा माल साठवण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक * टीव्ही, फ्रीजसारख्या उत्पादनासाठी वापरले जाणारे थर्माकोल * बिस्कीट, चिप्स, औषधी, वेफर पुद्याची वेष्टने…….

COMMENTS