पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमभाई मोदी हे महाराष्ट्राच्या दौ-यावर आले आहेत. यादरम्यान आज त्यांनी आळंदीचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी आळंदी शहरात गुटखाकिंग म्हणून नावारुपाला आलेल्या सागर बोरुदिंयाच्या कार्यालयाला भेट दिली आहे. मागील काही वर्षांत गुटखाकिंग म्हणुन सागर बोरुंदिया वादग्रस्त ठरलेला आहे. आळंदी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांनी बोरुंदियाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. ते वादग्रस्त ठरले होते. माध्यमांतून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
आता तर पंतप्रधानांच्या बंधुंनीच गुटखाकिंगाच्याच कार्यालयात येऊन पाहुणचार घेतला आहे. बोरुंदीयावर गुटखा बंदी असताना गुटख्याचा बेकायदा व्यापार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात त्याला जेलची हवाही खावी लागली होती. त्यानंतर आता स्वतः पंतप्रधान मोदींच्या बंधूनीच बोरुंदीयाची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS