नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारने सन्मान आज करण्यात आला आहे. दिल्लीत ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी मोदींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २६ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान पुरस्कारानंतर पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा माझा नव्हे सर्व भारतीयांचा सन्मान आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्व भारतीय कटिबद्ध आहेत. भारतातील मच्छीमार, जंगलावर प्रेम करणाऱ्यांचा हा सन्मान असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच पृथ्वी आणि पर्यावरणाची काळजी करणाऱ्यांचा हा सन्मान असून जे पर्यावरणाकडून घेतात पण तितकच निसर्गाला देतात त्यांचाही हा सन्मान असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
COMMENTS