पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे, 92 देशांच्या भेटीमध्ये कोट्यवधींचा खर्च !

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे, 92 देशांच्या भेटीमध्ये कोट्यवधींचा खर्च !

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात अनेक देशांचे दौरे केले आहेत. या दौ-यादरम्यान कोट्यवधींचा खर्च झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत विदेश दौ-यावर पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानानं एवढा मोठा खर्च केला आहे. त्यामुळे मोदी हे देशाचे सर्वात महागडे पंतप्रधान ठरले आहे. दरम्यान साडेचार वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण 2 हजार 21 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात 113 देशांचे दौरे केले होते. तर सध्याचे पंतप्रधान मोदींनी 92 देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये त्यांनी काही ठराविक देशांना एकापेक्षा अधिकवेळेस भेटी दिल्या आहेत. तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात 93 देशांचे दौरे केले होते. मात्र, मनमोहनसिंग यांचे हे परदेश दौरे दहा वर्षांसाठी होते. तर इंदिरा गांधी यांचे 113 देशांचे दौरे हे 15 वर्षांच्या कार्यकाळातील होते. परंतु अवघ्या साडेचार वर्षात 92 दौरे करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

 

COMMENTS