लातूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज लातूरमधील औसा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी पंतप्रधान मोदी,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांच्या महामिलावट सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट बनली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी असल्याचा आरोप मोदींनी केला. तसेच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून मारू ही नव्या भारताची निती असल्याचही मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसने जर देशाची फाळणी होऊ नये यासाठी १९४७मध्ये एकजूट झाली असती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा कारण त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. काँग्रेसकडून लोकांना आता अपेक्षा नाही, मात्र शरदराव तुम्हाला तरी हे शोभतं का? असा सवाल यावेळी पंतप्रधानांनी केला.
तसेच सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही देशासमोर ठेवला आहे. तसेच सुशासन हाच आमचा मंत्र असून या भावनेनेच नव्या भारताच्या निर्माणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. एकीकडे आमच्याकडे धोरण आणि दुसरीकडे विरोधकांची विरोधी भूमिक असल्याचंही यावळी मोदींनी म्हटलं आहे.
COMMENTS