वर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रातील वर्धा येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे त्यांना माहित आहे. त्यामिळेच त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी आघाडीवरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात अशी टाकाही मोदींनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिटविकेट झाले असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला आहे.
COMMENTS