नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत आज
अभिनेता अक्षय कुमारने घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वयक्तिक आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या. या मुलाखतीत अक्षयने मोदींना त्यांच्या झोपेविषयी प्रश्न विचारला. ‘तुम्ही फक्त ३ ते ४ तासच का झोपता?,’ त्यावर मोदी म्हणाले, ‘मला अनेकजण हा प्रश्न विचारतात. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता.
आबामा आणी मी खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चं नुकसान करतोयस असं ते म्हणायचे. पण माझ्या शरीराला तशी सवयच लागली आहे. ३ ते ४ तासांत माझी झोप पूर्ण होते. इतकीच माझी झोप आहे आणि ही सवय मला खूप आधीपासून लागली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.’
तसेच मी पंतप्रधान होईल असा कधी विचारही केला नव्हता. मला फक्त देशासाठी काम करण्याची इच्छा होती, मला लहानपणी सैनिक होण्याची इच्छा होती. लहानपणी कोठेही सैनिक दिसले की मी त्यांना सलाम करायचो, असं मोदींनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS