नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर भाषण केलं. परंतु या भाषणात मोदी यांनी थोडीफार हेराफेरी केली असल्याचं समोर आलं आहे. हिंदुस्थानात २०१४ साली आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली तेव्हा आमची मस्करी केली गेली. मात्र अस्वच्छतेमुळे तीन लाख बालकांचे मृत्यू होत होते ते आता थांबले असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अहवालात म्हटले असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. परंतु वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अवालातील मुद्दे सांगताना मोदींनी थोडाफार बदल केला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अहवालात मोदींच्या स्वच्छता मोहीमेची स्तुती केली होती. ‘जर ही मोहीम अशीच सुरू राहिली आणि ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश १०० टक्के हागणदारी मुक्त झाला तर अस्वच्छतेमुळे होणारे तीन लाख मुलांचे मृत्यू रोखता येऊ शकतात असं या अहवालात म्हटलं होतं. परंतु आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी तीन लाख मुलांचे अस्वच्छतेमुळे मृत्यू होत होते ते आता थांबले असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अहवालात म्हटले असल्याचा दावा केला आहे. याबाबचे वृत्त सामनाने दिले असून मोदींच्या या दाव्यामुळे सरकारवर टीका करणा-या विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.
COMMENTS