नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एक रेकॉर्ड करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधा नरेंद्र मोदींनी गुजरातच्या प्रचारात समुद्री विमान वापरून रेकॉर्ड केला होता. त्यांच्या या रेकॉर्डमुळे देशभरात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर रेकॉर्ड करणार आहेत. मोदी हे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभाग घेणार आहेत. 20 वर्षानंतर या फोरमध्ये सहभाग घेणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. तसेच या फोररमध्ये त्यांचा मुख्य पाहूण म्हणून सन्मान केला जाणार असून हा मान मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
दावोस या फोरमध्ये जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधीश एकत्र येऊन देशांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चर्चा केली जाते. या चर्चासत्रात भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयांभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून भारतामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मोदी या परिषदेचा चांगला उपयोग करतील असे तज्ज्ञांचे मत आहे. जानेवारी महिन्यात ही परिषद होत असून पंतप्रधान मोदी २३ ते २६ जानेवारी असा स्वित्झर्लंडचा दौरा करणार आहेत.
COMMENTS