नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच राम मंदिराच्या अध्यादेशाचा विचार केला जाईल असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षातली पहिली मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील २० राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी १०० सभा घेणार आहेत. या सभांमध्ये ते चार वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे जनतेपुढे मांडणार आहेत. ३ जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरुदासपूरमध्ये पंतप्रधानांची रॅली पार पडणार आहे.
तसेच ४ जानेवारी मणिपूर आणि आसाम या ठिकाणी रॅली होणार आहे. त्यानंतर ५ जानेवारी झारखंड आणि ओदिशा, २२ जानेवारी वाराणसी आणि २४ जानेवारी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यात ते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या सभांचा आगामी निवडणुकीत काय प्रभाव पडणार हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS