लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदारांची बैठक, बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदारांची बैठक, बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी हे भाजपच्या महिला खासदारावर भडकले असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला  पंतप्रधान मोदींसह गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 250 खासदार उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींची नजर उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत यांच्याकडे गेली. प्रियंका रावत या मोबाईलवर व्हिडीओ शटींग करत असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले. तसेच ती रेकॉर्डिंग डिलीट करुन मोबाईल बंद करण्याचे आदेश त्यांनी प्रियंका यांना दिले. एवढ्यावरच न थांबता मोदींनी प्रियांका यांनी ती रेकॉर्डिंग डिलीट केली की नाही हे याची चाचपणी करण्याचे आदेश त्यांनी बैठकीतील एका सदस्याला दिले. त्यामुळे या बैठकीदरम्यान प्रियंका रावत या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

भाजप खासदार प्रियंका रावत

दरम्यान यापूर्वीही झालेल्या अनेक वादांमुळे  प्रियंका रावत या चर्चेत आहेत. यापूर्वी एका ट्रेनी आयएएस अधिका-याला धमकावल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरलं झाला होता. त्यामध्ये त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना काही त्रास झाला तर मी तुमचं जगण मुश्कील करुन टाकेन अशी धमकी त्यांनी त्या आयएएस अधिका-याला दिली होती. त्यामुळे त्या चांगल्याच वादाच्या भोव-यात सापडल्या होता.

 

COMMENTS