गोंदिया – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोंदियात जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा दहशतवाद्यांप्रती सहानुभूती दाखवतो. शरद पवार हे माजी संरक्षणमंत्री आहेत. त्यांना काँग्रेसचा हा जाहीरनामा मान्य आहे का असा सवाल त्यांनी शरद पवारांना यावेळी केला आहे.
दरम्यान ही निवडणूक देशाच्या शत्रुंना झुकते माप देणाऱ्या आणि देश प्रेमीमधली निवडणूक आहे. मी मागील वेळेसे आलो होतो तेव्हा सांगितलं होते की पुन्हा येईल तेव्हा व्याजासोबत विकास घेऊन येईल. दिल्लीतील एसी मध्ये बसलेले लोक नव्या नव्या कथा सोडत असतात. निवडणूकीत थोडी जर चुक झाली तर पुन्हा माओवाद्यांना बळ मिळेल त्यामुळे सावध राहा असं आवाहनही यावेळी त्यांनी जनतेला केलं आहे.
तसेच पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली असून काँग्रेसला मोदी असल्याने लोकांचं भलं होतं आहे आणि आपली मलाई जात असल्याची चिंता सतावत आहे असल्याचा टोलाही यावेळी नरेंद्र मोदींनी लगावला.
COMMENTS