नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संपूर्ण देशात पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे हे 21 दिवस तुम्ही बाहेर जाण विसरुन जा असही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 22 मार्चरोजी आपण जनता कर्फ्यू पाळला होता. परंतु आता हा जनता कर्फ्यू नसून त्याहून एक पाऊल पुढे असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाय्रांवर आता मोठी कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मोदींनी दिले आहेत.
दरम्यान देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा 519वर पोहोचला असून महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे.अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
COMMENTS