बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधान झालो – नरेंद्र मोदी

बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधान झालो – नरेंद्र मोदी

बिजापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी पंतप्रधान झालो असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्यमान भारत योजनेच्या शुभारंभ केला. यावेळी बोलत असताना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झालेली असताना बिजापूरचा मागासलेपणा मागच्या सरकारमुळेच कायम असल्याचं ते म्हणाले आहेत. गरीब घरातील आईचा मुलगा आणि अती मागास समाजातून आलेली एखादी व्यक्ती जर पंतप्रधान होऊ शकते तरी ती केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असे उद्गाव मोदी यांनी काढले आहेत.

दरम्यान ’14 एप्रिल हा दिवस देशातील सव्वाशे कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. आयुष्यमान भारत योजना ही केवळ आरोग्यसेवा देण्यापुरती सीमित नसून आरोग्यपूर्ण, ताकदवान असा नव्या भारताच्या निर्मितीसाठी लोकांना समाविष्ट करुन घेण्यासाठी असल्याचं यावेली पंतप्रधा मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच आयुष्यमान भारत ही योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असून सर्व स्तरातील प्राथमिक आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशाच्या 40 टक्के लोकसंख्येला विम्याचे संरक्षण देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. आजवर आरोग्यसेवांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा हा त्यामागचा उद्देश असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS