नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसने मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला नाही म्हणून डॉ. आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता. पंडित नेहरूंनी काँग्रेसने मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला नव्हता. १९५० नंतर पहिल्यांदाच भाजपने आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचे काम केले असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजप संसदीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. काल घेण्यात आलेल्या बैठकीत मराठा आरक्षण/ओबीसी संविधानिक दर्जा देण्याबाबतचा मुद्दा गाजला. अनंत कुमार यांनी मराठा आंदोलनाचा उल्लेख केला असून मराठा आंदोलन झाले तरी महापालिकेत भाजपचा विजय झाला आहे. तसेच लोकांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असून मराठा आंदोलनाची झळ पक्षाला बसली नाही अनंतकुमार यांनी म्हटलं आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान १ ते ९ ऑगस्ट हा ‘सामाजिक क्रांती’ दिवस साजरा करावा. कारण याच आठवड्यात एससी/एसटी विधेयक आणि मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट ‘सामाजिक न्याय पंधरवडा’ साजरा करा असंही मोदींनी म्हटलं आहे. तसेच या पंधरवड्यात सत्काराचे किमान ५० कार्यक्रम करा. प्रत्येक खासदारांनी आपआपल्या मतदारसंघात कार्यक्रम घ्या. खासदार रेल्वे स्टेशन, एअरपोर्टवर उतरल्याबरोबर मोठे स्वागत व्हायला पाहीजे तसेच ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिल्याचं महत्त्व लोकांना सांगा असे आदेशही मोदींनी या बैठकीत दिले आहेत.
COMMENTS