अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज अहमदनगर येथे पार पडली. यावेळी मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. मात्र, शरद रावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? असा सवाल मोदींनी शरद पवारांना केला आहे.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे जम्मू-काश्मीरला वेगळं करण्याची भाषा करणाऱ्यांसोबत आहेत. काँग्रेसच्या लोकांकडून मला अपेक्षा नाही. मात्र, शरदरावांना काय झालंय तेच मला कळतं नाही. तुम्ही देशाच्या नावाने काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना तुम्ही कधीपर्यंत गप्प राहणार? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देशाला आता विदेशी चष्म्यातून पाहत आहात का? असा सवालही यावेळी पंतप्रधानांनी केला आहे. आज अहमदनगर येथील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज मोदी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
COMMENTS