मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. या युतीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही युती यापुढेही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करत राहणार आहे. शिवसेनेसोबत आमची मैत्री ही राजकारणाच्या पलिकडची आहे. देशाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनेमुळे एनडीए आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्रात ही युती एकमेव निवड असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1097518253751132162
दरम्यान काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपनं युतीची घोषणा केली आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.
COMMENTS