पंतप्रधान मोदींकडून स्वावलंबी भारत अभियान पॅकेजची घोषणा, 17 मे नंतरही असणार लॉकडाऊन!

पंतप्रधान मोदींकडून स्वावलंबी भारत अभियान पॅकेजची घोषणा, 17 मे नंतरही असणार लॉकडाऊन!

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन हा 17 मेपर्यंत तीनवेळा वाढवण्यात आला. आता तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. तसेच लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा 17 मे पूर्वी जाहीर केलं जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच हा लॉकडाऊन नव्या रुपात आणि नव्या नियमात असणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज आहे.20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल असंही मोदींनी म्हटलं आहे. या पॅकेजमध्ये लॅंड, लेबर, लिक्वडिटी आणि लॉ या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग याच्यांसाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे. जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो. आर्थिक पॅकेजमुळे सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढवेल. शेती व उद्योगांना या पॅकेजचा फायदा होईल असंही मोदींनी म्हॉलं आहे.

नियमांचं पालन करुन आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्याला आपला संकल्प आणखी मजबूत करायला हवा. आपला संकल्प या संकंटापेक्षाही मोठा आहे. 21 वं शतकहे हिंदुस्तानचं आहे. कोरोना संकंट नंतरही जगभरात जे घडत आहे ते आपण बघत आहोत. दोन्ही कालखंडाला भारताच्या नजरेने बघितलं तर जाणवतं की, 21 वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर आपली सर्वांची जबाबदारी आहे.

कोरोनासारखं संकट कधीही पाहिलं नाही, हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मनुष्याला मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

COMMENTS