नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान, ‘या’ नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ !

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान, ‘या’ नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ !

 

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत, 2014 प्रमाणेच यावेळीही मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी एक मेगा इव्हेंट ठरला आहे.या सोहळ्याला देश विदेशातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून  हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख आले आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहिले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंग यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. अमित शाह यांना कोणतं खातं देण्यात आलं आहे ते स्पष्ट होणार आहे मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार देण्यात येणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. अमित शाह यांची केंद्रीय मंत्रीपदावर निवड झाल्यावर आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण बसणार याचीही चर्चा रंगली आहे.

 

 

 

COMMENTS