“पंतप्रधान मोदींना 72 तास देतो, अन्यथा मी स्वतः बदला घेणार !”

“पंतप्रधान मोदींना 72 तास देतो, अन्यथा मी स्वतः बदला घेणार !”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 72 तास देतो, अन्यथा मी स्वतः माझ्या मुलाच्या हत्येचा बदला घेईन असा अल्टीमेटम शहीद जवानाच्या वडिलांनी दिला आहे. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब हा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाला आहे. त्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण असून निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या औरंगजेबच्या वडिलांनी मुलाच्या हौतात्म्यानंतर केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा, अन्यथा मी स्वत: त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान औरंगजेबच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्या औरंगजेबचं पुलवामा याठिकाणी अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचे वडिल हनीफ यांना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीतही देशासाठी लढण्याची व मरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. ‘औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा’, असं आव्हान त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून याबाबत काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS