“नरेंद्र मोदी देशाचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान !”

“नरेंद्र मोदी देशाचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान !”

सातारा – नरेंद्र मोदी देशाचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान असल्याचं मी मानत आहे असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. गुरुवारी आयोजिक करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. जनतेत सध्या अस्वस्थता असून सर्वांची घुसमट होत आहे. जनतेला बदल हवा आहे. तो आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याचही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुमची घुसमट थांबवायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान भाजपच्या धोरणामुळे जातीय दंगली होतील, असे मी भाकीत केले होते. तसेच झाले असल्याचही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच आता पुढील सहा महिन्यात आणखी जातीय दंगली होतील. संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र बिघडला असताना साताऱ्याचे काय घेऊन बसलाय, असा प्रश्नही त्यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच साता-याचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेच्या हातात एकहाती सत्ता देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

COMMENTS