मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्साही आणि गतिशील नेते आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असं ट्विट मोदी यांनी केले आहे.
Birthday greetings to the energetic and dynamic CM of Maharashtra, @Dev_Fadnavis Ji. For the last 5 years, he has steered the state to new heights of growth. He has assiduously worked for the welfare of the poor. May he be blessed with good health and many more years of service.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2019
दरम्यान गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत बजावले आहे. तसेच ज्याला वाढदिवसासाठी खर्च करायची इच्छा असेल, त्यांनी तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच गेल्या महिन्याभरात तिवरे धरण दुर्घटना, मालाड भिंत दुर्घटना, गोरेगाव-वरळीत झालेले मुलांचे मृत्यू आणि आता डोंगरीत कोसळलेली भिंत या दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यंमत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग्ज, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, हे प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत. जे कुणी असे करताना आढळतील, त्यांच्यावर रीतसर पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल. असेही मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे.
COMMENTS