नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळा असे आवाहन केलं आहे. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, पर्याय नसेल तरच त्या दिवसी घराबाहेर पडा असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच जे आपत्कालीन सेवेत काम करतात त्या सर्वांचे संध्याकाळी 5 वाजता धन्यवाद माना. संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दरवाज्यात, खिडकीत, बाल्कनी 5 मिनिटे उभे राहून त्यांचे आभार व्यक्त करा असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संपूर्ण जग मोठ्या संकटातून जात आहे. यापूर्वी जेव्हा कधी कोणतं नैसर्गिक संकट आलं तेव्हा ते फक्त काही देशांपुरता मर्यादित होतं. मात्र, यावेळी संपूर्ण जगात मानव जातीवर संकट ओढावलं आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हाही एवढे देश प्रभावित झाले नव्हते जेवढे आज कोरोनामुळे झाले आहेत.
या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील व्यक्तींना आवाहन आहे की, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेता त्यांचा पगार कापू नका असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
तसेच गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या विविध बातम्या आम्ही बघत आणि एकत होतो. या दोन महिन्यात भारताच्या 130 कोटी नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीचा खंबीरपणे लढा दिला आहे. सर्वांनी सावधगारी बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण निर्माण झालं आहे की, आपण संकंटपासून वाचलेलो आहोत. असं वाटतं सगळं ठिक आहे. मात्र, ते खरं नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सतर्क राहणं गरजेचं असलंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS