नवी दिल्ली – 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी देशाला संबोधित करताना मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छांसह रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा दिल्या. जम्मू काश्मीरमधील कलम 370 वरुन त्यांनी विरोधकांवर हल्ला केला.जे 70 वर्षात झालं नाही ते 70 दिवसात केलं असल्याचं त्यांनी त्यांनी म्हटलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती ‘एक देश, एक संविधान’ हे अभिमानाने सांगत आहे. आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचाराला पुढे घेऊन जात आहोत.
तसेच कलम 370 ला पाठिंबा देणाय्रा नेत्यांना मोदींनी प्रश्न विचारला आहे. हे कलम एवढंच गरजेचं होतं मग 70 वर्षात तुम्ही त्यांना तात्पुरतं नागरिक ठेवलं? पुढे येऊन तुम्ही त्यांना कायमस्वरुपी नागरिक बनवायचं होतं. पण तुमच्यात तेवढी हिंमत नव्हती. असं मोदींनी यावेळी म्हटलं आहे. तसेच आजच्या भाषणात मोदींनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. तिन्ही सैन्यदलात समन्वय साधण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवं पद निर्माण करण्याची घोषणा मोदींनी केली आहे. भारतीय सैन्याच्या इतिहासात हे पद पहिल्यांदा बनवण्यात आलं आहे.
देश एक एक निवडणुकीवर विचार करण्याची गरज
एक देश एक संविधानानंतर आता देशाला एक देश एक एक निवडणुकीवर विचार करण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. जीएसटीद्वारे आम्ही ‘एक देश, एक कर’चं स्वप्न पूर्ण केलं. ऊर्जाच्या ‘एक देश, एक ग्रीड’ला पुढे नेलं. आता देशात एकत्रित निवडणुकीचीही गरज असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
आता मिशन प्रत्येक घरात पाणी
देशभरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी आमचं सरकार आता प्रत्येक घरात पाणी या दिशेने पाऊल उचलत आहे. जल जीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटींचा निधी देण्यात येणार असून. प्रत्येक घरात पाणी ही योजना आपण राबवणार आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यासाठी पाणीसाठा, समुद्राच्या पाण्याचा वापर, सांडपण्याचा वापर, कमी पाण्यात शेतीबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवली जाणार असल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.
COMMENTS