भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी केली मोठी चूक, सोशल मीडियावर जोरदार खिल्ली !

भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी केली मोठी चूक, सोशल मीडियावर जोरदार खिल्ली !

नवी दिल्ली –  बिहारमधील एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदींनी मोठी चूक केली आहे. त्यांच्या या चुकीमुळे देशभरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी बिहारच्या मोतिहारी येथील कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी महात्मा गांधींचं चुकीचं नाव घेतलं. ”बिहारने मोहनलाल करमचंद गांधी यांना महात्मा बनवलं, त्यांना बापू बनवलं असल्याचं मोदींनी म्हटलं परंतु महात्मा गांधींचं नाव महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून पंतप्रधान मोदींनी चुकून मोहनलाल करमचंद गांधी असं म्हटलं आहे. मोदींच्या या चुकीमुळे देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरलं होत असून राष्ट्रपिताचं नाव माहीत नसलेले ते (मोदी) देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, की त्यांनी असं जाणूनबुजून केलं. ५ वर्षाच्या चिमुकल्यालाही माहिती आहे की गांधीजींचं नाव मोहनदास करमचंद गांधी होतं’ अशी जोरदार टीका काँग्रेसनं केली आहे. तसेच अशाप्रकारची चुकी मोदींकडून पहिल्यांदाच झालेली नसून अनेकदा त्यांनी गांधीजींचं नाव घेतना चूक केली असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.’महात्मा गांधींचं पूर्ण नाव माहिती नसणं हा शिक्षणाचा फरक असून नथुरामचं नाव विचारलं तर संपूर्ण खानदानाचं नाव हे लोक सांगतील अशी टीका आता ट्वीटरवर केली जात आहे.

COMMENTS