मुंबई : आपण अनेक वेळा घर, गाडी व दुकान आदींची विक्री करण्याची जाहिरात ओएलएक्ससारख्या वेबसाईटवर पाहिली असले. पण अशी जाहिरात एखाद्या नेत्याच्या कार्यालयाची असले तर. हो अशी एक घटना उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय विक्रीला काढल्याची जाहिरात व्हायरल झाल्याने देशात एकच खळबळ उडाली.
OLX वर सर्व काही विकणे शक्य असल्याचा दावा ही कंपनी करत असताना प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयच OLX वर विक्रीला आल्याच्या वृत्त आलं आहे. या संबंधी वाराणसी पोलीसांनी अधिक तपास केला असता ही जाहिरात काही उचापतीखोर लोकांनी टाकली असल्याचं समोर आले. वाराणसी पोलिसांनी या संबंधी चार लोकांना अटक केली आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष पंतप्रधानांशी संबंधित असल्याने वाराणसी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अटक केलेल्या या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील कार्यालयाचा फोटो काढून OLX या वेबसाईटवर ‘विकणे आहे’ या मथळ्याखाली टाकला. त्यांनी या कार्यालयाची विक्री किंमत 7.5 कोटी रुपये इतकी ठरवली होती. OLX वरील या जाहिरातीत मोदींच्या कार्यालयाचे आतील भागाचे फोटो, आतील खोल्या, पार्किंगची सुविधा आणि इतर अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण जेव्हा पोलिसांच्या ध्यानात आले तेव्हा पोलिसांनी तातडीनं OLX शी संपर्क करुन ही जाहिरात हटवण्यास सांगितली.
COMMENTS