मुंबई – राफेल करारावरून आता शिवसेनेनही आक्रमक भूमिका घेतली असून या कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार असल्यामुळे मंत्रिमंडळातील इतर कोणीही या मुद्यावर उत्तर न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर देण्याती मागणीही राऊत यांनी केली आहे.
दरम्यान फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलाँद हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र असून मोदींच्या विनंतीवरुन ओलाँद भारतातही आले होते. मात्र, आता खुद्द ओलाँद यांनीच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे त्यांच्या दाव्याला उत्तर देण्याची सर्वस्वी जबाबदारी मोदींची आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील इतर कोणीही या मुद्यावर उत्तर न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावे असं राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS