पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकप्रियतेत असाउद्दीन ओवीसींचं आव्हान !

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकप्रियतेत असाउद्दीन ओवीसींचं आव्हान !

दिल्ली – सोशल मीडियातील लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडी कायम आहे. फेसबूकनं जारी केलेल्या एका अहवालत ही बाब स्पष्ट झाली आहे. फेसबूकनं भारतातील खासदारांची फेसबूक पेजवरील लोकप्रतितेचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. फेसबूक पेजवरील पोस्ट त्यावरील लाईक्स, प्रतिक्रिया, शेअर यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. फेसबूक पेजवरील लोकप्रियतेमध्ये अव्वल स्थानी अर्थात पंतप्रधनान नरेंद्र मोदी आहेत. दुसरा क्रमांक हा एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांचा लागतो. तर तिसरा क्रमांक आम आदमी पार्टीचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांचा लागतो आहे.

1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावतीधील आकडेवारीनुसार लोकप्रियता ठरवण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणाबत दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल फेसबूकनं ओवेसींना पक्ष लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर ओवेसी यांनी याचं श्रेय आपल्या सोशल मीडिया टीमला दिलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांचही अशा प्रकारचा अहवाल जारी करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दुस-या तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे तिस-या क्रमांकवर आहेत. आता फेसबूकवरील लोकप्रियता या नेत्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायद्याची ठरते ते येणा-या काळात स्पष्ट होईलच.

COMMENTS