पुणे – आजपर्यंत तुकाराम मुढेंचं गुणगाण गाणा-या भाजपलाच आता तुकाराम मुढे नकोसे झाले आहेत. पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष् तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. तुकाराम मुंढे हेकेखोर असून त्यांच्यामुळे पीएमपीएमएलचं उत्पन्न घटलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी अनेक कामगारांना रस्त्यावर आणलं असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिस्तप्रिय असणा-या तुकाराम मुंढे यांनी अनेक टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच १५८ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच पदाधिकारी नाराज असून आता पिंपरी-चिंचवडमधील सत्तारूढ नेते एकनाथ पवार यांनी त्यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महापौरांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला असून भाजपच्या सर्वच नगरसेवकांची ही मागणी असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS