रायपूर – छत्तिसगडमध्ये विधानसभेची निवडणुक तोंडावर आली आहे. त्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्यावर राजकारण रंगलंय. छत्तिसगडमधील बिलासपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते उद्योगमंत्री अग्रवाल यांच्या घरासमोर आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची जोरदार पिटाई केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अटल श्रीवास्तव यांच्या तर डोक्यात काठी मारली. ते खाली पडल्यानंतही पोलिसांनी त्यांना जोरदार मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मरुन कुर्त्यामध्य असलेले पक्षाचे राज्य सरचिटणस आहेत. त्यांच्या डोक्यात काठी मारण्यात आली. ते खाली पडल्यावरही पोलिसा त्यांना मारहाण करत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनमधून बाहेर काढून पोलिसांनी जनावारांसारखी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आर पी सिंग यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री अग्रवाल यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात किरकोळ हाणामारी झाली. त्यामध्ये काही पोलिस किरकोळ जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांविरोधात एफआरआय दाखल केला. तसंच अधिकची कुमक मागवली. थेट काँग्रेसभवन गाठले. त्यानंतर काँग्रेसभवनमधून नेत्यांना बाहेर काढून मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने मारहाण झाल्याचं कबुल केलंय. दोषींवर कारवाई केली जाईल अस आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
COMMENTS