हैदराबाद – देशात राजकीय हवा काहीही असो. राजकीय पंडित काहीही म्हणोत. मात्र हैदराबादच्या एका ज्योतीषाने पुढील काही वर्षातील राजकीय स्थिती काय असेल याचं भविष्य सांगितलं आहे. हैदराबादमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यामध्ये मोदींचे सरकार पुन्हा येणार का ? तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण होणार ? डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. एवढचं नाही तर एका बॉलिवून कन्येबद्दलही भविष्य सांगितलं आहे.
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्य़ा राय – अभिषेक बच्चन यांची कन्या आराध्या ही राजकारणात येणार आहे. खंरतर आराध्या सध्या केवळ 6 वर्षांची आहे. त्यामुळे तिचं करिअर काय असेल हे आताच सांगण घाईचं होईल. मात्र तरीही आजी आजोबा, आई वडिल हे सगळे बॉलिवूडमध्ये असताना आराध्याही त्याच पावलावर पाऊल ठेवेल असं सगळ्यांना वाटू शकतं. मात्र हैदराबादच्या डी. ज्ञानेश्वर या ज्योतीषानं मात्र आराध्या राजकारणात येईल असं भविष्य वर्तविलं आहे.
आराध्याला राजकारणात येईल. मात्र तिला त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तिला तिचं नाव बदलावं लागेल. तिला तिचं नाव रोहिणी असं ठेवावं लागेल. असं केलं तर ती राजकारणात मोठं यश मिळवेल असं ज्ञानेश्वर यांनी सांगितलं आहे. केवळ राजकारणात येणार नाही तर ती देशाची पंतप्रधानही होऊ शकते असं ज्ञानेश्वर यांचं म्हणणं आहे. आई वडिल नसले तरी आजी आजोबा राजकारणात होते आणि आजही आहेत. वडील काँग्रेसचे खासदार होते. पुढे त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडून आपल्या मुळ व्यवसायात स्थिर झाले आणि त्यामध्ये त्यांनी मोठं यशही मिळवलं. तर आजी जया बच्चन या आजही समाजवादी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे आता आराध्या राजकारणात येणार का आणि देशाची पंतप्रधान होणार का ? हे काळच ठरवेल.
देशातलं वातावरण मोदींच्या विरोधात जात असलं आणि पुन्हा मोदींना सत्तेवर येण्याची अवघड स्थिती असली तरी मोदीच पुन्हा सत्तेवर येतील असंही भविष्य डी. ज्ञानेश्वर यांनी केलं आहे. मोदींप्रमाणेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष बनतील असंही भविष्य त्यांनी वर्तविलं आहे. भविष्यात रजनिकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनतील असंही भाकित त्यांनी केलं आहे. एवढच नाही तर भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल असंही ज्ञानेश्वर यांचं भाकित आहेत.
यापूर्वी डी. ज्ञानेश्वर यांनी काही भविष्य वर्तविली होती. त्यामध्ये रजनिकांत राजकारणात येईल अशी भविष्यवाणी वर्तविली होती. ती तंतोतंत खरी ठरली. ज्योतिषांवर प्रत्येकाचा विश्वास असेलच आणि ते खरेच ठऱेलच असे नाही. मात्र काही जणांची त्याच्यावर श्रद्धा आहे. त्यांनी त्यांना जे वाटतं ते घ्यावं. ज्यांचा ज्योतिषांवर विश्वास नाही त्यांनी गमंत म्हणून त्याकडे बघावे.
COMMENTS