मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. धर्म ही आपली वैयक्तिक बाब असून त्याचे राजकारण करणं चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.सरकारकडून धार्मिक राजकारण केले जात आहे. विकासाचा मुद्दा पुढे करून निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र विकास कुठे झालाच नाही’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी २०१९ निवडणुकीच्या अनुषंगाने शेकाप राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोमिलन पहायला मिळाले.
अगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
COMMENTS