मुंबई — उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहे असे म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर मनसेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप ही मुंबईची घाण असल्याची टीका केली आहे.
भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत, ते आपल्या मेहनतीने मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे वक्तव्य केले होते. रविवारी मुंबईतील साकीनाका येथे उत्तर भारतीय संमेलन आणि कलाकार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, पूनम महाजन त्या कार्यक्रमात बोलत होत्या.
मुंबईचे एक वैशिष्ट्य असून येथे जो कोणी येईल, तो येथलाच होऊन जातो. मुंबईची उत्तर भारतीय हे शान असून मुंबईच्या विकासात ते आपल्या मेहनतीने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्हाला देशाचे भाषा-प्रांत वादावरुन तुकडे करायचे नाहीत. उत्तर-दक्षिण भारत ही आपली संस्कृती आहे. आम्हाला उत्तर भारतीयांची शक्ती नाकारता येणार नाही. आम्हाला उत्तर भारतीयांनी मोठे नेते आणि अनेक पंतप्रधान दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: वाराणसीतून येतात. माझ्यासारख्या मराठी मुलीला उत्तर भारत दौऱ्यात सन्मान मिळाला आणि मिळत राहील, असे पूनम महाजन म्हणाल्या.
*#NewsAlerts*
उत्तर भारतीय मुंबईची शान: पूनम महाजन तर भा ज प ही मुंबईची घाण— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 21, 2017
COMMENTS