एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेतून लढवणार विधानसभेची निवडणूक, ‘या’ नेत्याला दिलं आव्हान !

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेतून लढवणार विधानसभेची निवडणूक, ‘या’ नेत्याला दिलं आव्हान !

मुंबई – एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. प्रदीप शर्मा यांनी मला नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मी मोहिम फत्ते करून दाखवेन असं म्हटलं आहे. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवतील अशी शक्यता आहे. तसेच ‘मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबा, बबलू श्री, वास्तव यांच्यासारख्या गँगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन हात केले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी ठाकूर मंडळी मोठी नाही.’ असं थेट आव्हान प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना दिलं आहे.

दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रेमापोटी शिवसेना हा पक्ष निवडला असून मी जेव्हा निलंबित झालो होतो तेव्हा ‘धाडसाची धिंड’ हा बाळासाहेबांचा अग्रलेख मी आजही सांभाळून ठेवला आहे. मी जेव्हा साडेतीन वर्षे जेलमध्ये होतो तेव्हा मला एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली, ती मी कधीच विसरू शकणार नाही. मिळेल ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे. असंही प्रदीप शर्मा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS