भूम – शेतकऱ्यांना दादागिरीची भाषा करणाऱ्याला सत्तेपासून  बाजूला ठेवा – प्रकाश आंबेडकर

भूम – शेतकऱ्यांना दादागिरीची भाषा करणाऱ्याला सत्तेपासून बाजूला ठेवा – प्रकाश आंबेडकर

उस्मानाबाद – धनदांडग्यांच्या ऐवजी सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. या मतदारसंघाचा कायापालट होईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेशभाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ भूम नगरपालिकेच्या समोर झालेल्या सभेत ते बोलत होते. त्या प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की त्या काळी स्व. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखाने हे सहकारी तत्वावरच चालवले जावे असा कायदा सर्वसामान्यच्या हितासाठी तयार केला होता. तेव्हा आपली लोकसंख्या 35 कोटी होती. परंतु या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आत्ताची लोकसंख्या 129 कोटी असताना देखील कायदा मोडून खाजगीकरण करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दादागिरीची भाषा करू लागले आहेत.

यांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारला 22000 कोटी रुपयांचा टॅक्स जमा होतो. तो रोजगार हमीवर खर्च करण्याची तरतूद आहे. तरी पण मागील 10 वर्षा पासून हे सरकार रोजगार हमीवर पैसे खर्च न करता, रस्ते विकासासाठी तारण ठेवला आहेत. सत्ता आमच्या हातात दिली तर हा पैसा बेरोजगारांना कामे व भत्ता वाटप करण्यासाठी वापरु असेही ते म्हणाले. 21 टीएमसी पाण्यावर बोलताना सांगितले की गेल्या 15 वर्षा पासून मी हे ऐकत आहे. याचे नुसते राजकारण चालू आहे. ते पाणी आज ना उद्या मिळणारच आहे. आम्ही सत्ता श्रीमंत होण्यासाठी मागत नाहीत, तसे असते तर मागेच सत्तेत बसलो असतो.

आम्हाला बहुजनांचा विकास घडवायचा आहे. आपली सत्ताआली तर आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना पगारवाढ करू असे जाहीर केले. या प्रसंगी शेतकरी नेते गोरख भाऊ भोरे, नेते प्रवीण रणबागुल वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष मुजीब भाई पठाण, जिल्हाध्यक्ष वाघमारे, अनदुरकर सर, मुसभाई शेख, एजाज काजी, ऍड सिराज मोगल, वांचीतचे मुकुंद लगाडे, रसूल भाई पठाण, अनुराधा लोखंडे, तानाजी बनसोडे, परांडा तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड,वाशीचे दिलीप गरड, के टी गायकवाड, दत्ता शिंदे, नेते नवनाथ पडळकर जिप सदस्य सौ छाया ताई सुनीलभाऊ कांबळे, उषाताई सुरेशभाऊ कांबळे, प्रदीप कांबळे,सुभाष वाघमारे काकासाहेब मारकड आदी उपस्थित होते.

COMMENTS