मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वंचित बहूजन आघाडीनं मोठी घोषणा केली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी आम्ही कोणाच्याही संपर्कात नसून विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची आमची तयारी असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दोन आकडी संख्येत जागा मिळतील, असा विश्वासही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारीणीची घोषणा केली आहे. उपाध्यक्षपदावर शंकरराव लिंगे, अॅड विजयराव मोरे, धनराज वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महासचिव पदावर गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिव पदावर राजाराम पाटील, डॉ. अरूण सावंत, सचिन माळी, ए आर अंजेरीया, कुशलभाऊ मेश्राम, प्रा.किसन चव्हाण, अनिल जाधव, नवनाथ पडळकर, शिवानंदजी हैबतपूरे, यांची नियुक्ती केली आहे.
तसेच स्वतंत्र प्रभार व पक्षीय जबाबदारी
राम गारकर, सचिन माळी, मोहन राठोड,
प्रा.यशपाल भिंगे यांची नियुक्ती केली आहे.
मायक्रो ओबीसी व व्हिजेएनटी विधानसभा उमेदवारांची शोध समितीत प्रा.गोविंद दळवी,
प्रा.विष्णू जाधव,भीमराव दळे यांची नियुक्ती केली आहे.
पार्लमेंट्री बोर्ड
लक्ष्मणजी माने
अॅड अण्णाराव पाटील
अशोकराव सोनोने
महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
रेखाताई ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
COMMENTS