मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच ‘मातोश्रीवर जाणार आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. थोड्याच वेळात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार आहे. तसेच ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनबाबतही प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात भीमा कोरेगाव इथला कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तियामुळे या बैठकीकडो लक्ष लागलं आहे.
COMMENTS