पुणे – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या निवडणुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजनांची आघाडी स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. या आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात आज विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला लक्ष्मण माने, हरिभाऊ बधे, विजय मोरे यांच्यासह विविध संघटनांचे उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा प्रमाणे लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आलीय. यासाठी महाराष्ट्र भर दौरा केला जाणार आहे अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. तसंच राज्यात चार ते पाच ठिकाणी परिषदा घेण्यात येतील असंही सांगण्यात आलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे भाजपविरिधी महाआघाडी बनवण्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात या आघाडीत कोण कोण सामिल होतं ते पहावं लागेल.
COMMENTS