मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आंबेडकर यांनी दिले असून त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्न येत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. महिना झाला तरी काँग्रेस अध्यक्ष कोण होईल हे स्पष्ट नाही. जर वाटाघाटी करायच्या झाल्या तर कुणासोबत करणार? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.१३, १४ व १५ जुलै रोजी विदर्भातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. वंचितकडून १३ जुलै रोजी नागपूर, १४ जुलै रोजी अमरावती येथे त्यानंतर १५ जुलै रोजी अकोला वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा लढण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे.
COMMENTS