प्रकाश आंबेडकरांकडून आणखी पाच उमेदवारांची घोषणा, पुणे, बारामतीतून यांना उमेदवारी!

प्रकाश आंबेडकरांकडून आणखी पाच उमेदवारांची घोषणा, पुणे, बारामतीतून यांना उमेदवारी!

कोल्हापूर –  भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या आणखी पाच जागांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली आली आहे. काल कोल्हापूर येथे आंबेडकर यांची शिवाजी स्टेडियमवर सभा पार पडली. यावेळी त्यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे.

दरम्यान महाआघाडीत सामील होण्याची वाट न पाहता आता प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तसेच हव्या तेवढ्या जागा मिळत नसल्यामुळे आता एकला चलोची हाक आंबेडकर यांनी दिली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS