मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा आज केली आहे. येत्या १५ तारखेला राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत येण्याचं आवाहन दोन्ही पक्षातील नेत्यांनी केलं होतं. यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी अनेकवेळा बैठक घेऊन त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी 22 जागांची मागणी केली. आघाडीला एवढ्या जागा देणं शक्य नसल्यामुळे ही बोलणी इथेच फिस्कटली. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा आज केली आहे.
तसेच आंबेडकर यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे याठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS